Take a fresh look at your lifestyle.

रक्षकच झाले भक्षक, पतीविरोधात तक्रार करायला गेली अन् पोलीस उपनिरीक्षकाने डांबून ठेऊन ३ दिवस केला अत्याचार

महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- जयपूर: पोलिसांच्या खाकीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी घटना घडली आहे. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली. अलवर जिल्ह्यातील खेडली पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या महिलेवरच पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. खेडली ठाण्याचे उपनिरीक्षक भरत सिंहने महिलेला पोलीस स्टेशनच्या एका रुममध्ये घेऊन जात तिच्यासोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.

Advertisement

समजलेल्या माहितीनुसार २६ वर्षीय महिलेवर ५४ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने सलग तीन दिवस बलात्कार केला. महिलेने बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. २ मार्च रोजी पतीविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. पती तिला घटस्फोट देणार होता. पण तिला घटस्फोट नको होता. ती तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली. त्याच्याविरोधात काही कारवाई होईल अशी तिची अपेक्षा होती.

Advertisement

महिलेच्या तक्रारीनुसार, पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह याने पतीसोबतचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. तिला पोलीस ठाण्याच्या मागील आपल्या खोलीत नेले. तिथे तीन दिवस डांबून ठेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपी पोलिसाने तिच्या पतीविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.

Advertisement

महिलेला ७ मार्च रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी तिने सिंह याला विरोध केला. दुपारनंतर पीडितेने खेडली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी भरत सिंह याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ अधिकारी पोलीस महासंचालक हवासिंह घुमारिया ठाण्यात पोहोचले. ते म्हणाले की, पीडित महिलेने २, ३ आणि ४ मार्चला बलात्कार झाल्याची घटना सांगितली.

Advertisement

प्राथमिक तपासात पोलीस उपनिरीक्षक सिंह हा दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान अलवर पोलीस विभाग महिलांवरील अत्याचार आणि कामात हलगर्जीपणाच्या प्रकरणात नेहमीच चर्चेत असते. यावेळी तक्रारदार महिलेवरच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधिकाऱ्यानेच तिच्यावर अत्याचार केले. पाच दिवसांपूर्वी विहार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या विरोधातही एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

Advertisement
Advertisement