Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 :- अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांना काय-काय मिळालं? जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या 2020-21 चा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर करण्यास सुरुवात केली. कोरोनाशी सामना करत असताना आलेली तूट प्रमुखपणे मांडत आगामी वर्षात महसुलीत वाढ करण्याच्या उद्दीष्ट ठेवून विशेष योजना, शेतकरी, उद्योजकांसाठी महत्त्वाच्या घोषणा अजित पवार यांनी केल्या आहे. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांमुळं राज्याचं अर्थकारण सावरला. शेतकऱ्यांच्यामुळे साडेअकरा विकासदर वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दरानं कर्ज देण्यात येणार आहे.

Advertisement

कृषी विकास वाढावा यासाठी केलेल्या या ७ महत्वपूर्ण घोषणा :-

Advertisement

तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या व वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेंतर्गत लाभार्थींना गाय व म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसंच, कंपोस्टिंगसाठी अनुदान
कृषी, पशू संवर्धन, दूग्ध व मत्स्यव्यवसाय विभागास ३ हजार २७४ कोटी नियतव्यय
शेतकऱ्यांना कृषी पंप वीज जोडणी देण्यासाठी महावितरणला दरवर्षी १ हजार ५०० कोटींचे भागभांडवल
राज्यातील चार कृषी विद्यापीठांना येत्या तीन वर्षांत ६०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटी रुपयांची योजना
प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे ५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार

Advertisement
Advertisement