Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 :- अजित पवारांची मोठी घोषणा; महिलांना मुद्रांक शुल्कात सूट, तर विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास

महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्य सरकारने महिला दिनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजणा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना अशा दोन मोठ्या घोषणा केला आहेत.

Advertisement

“कुटुंबातील महिलाच घराची गृहलक्ष्मी असते असं आपण म्हणतो त्यामुळे गृहस्वामिनी खऱ्या अर्थानं तेव्हाच ओळखली जाईल जेव्हा तिच्या नावावर ते घर असेल. त्यामुळे आज महिला दिनाचं औचित्यसाधून राज्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा करत आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Advertisement

योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तर मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येईल आणि याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले. कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलं.

Advertisement

कोरोनामुळे उद्भवलेल्या खडतर परिस्थितीत राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत प्रवास करता यावा यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु करण्यात आली आहे.

Advertisement

तसेच मुलींचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार असून याअंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनीना मोफत बस प्रवास करता येईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. शहरात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणखी १५०० पर्यावरणपूरक हायब्रीड तेजस्विनी महिला बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Advertisement
Advertisement