तुम्हाला माहिती आहे का, हृदयविकाराचा झटका सहसा बाथरूमध्येच का येतो ?
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- बघा हे सांगणं बरोबर नाही कि,जास्तीत जास्त हृदयविकाराचा झटका हा बाथरूम मध्ये येतो. पण आपण हे मात्र बोलू शकतो कि, बहुतेक हृदयविकार झटक्याच्या घटना ह्या बाथरूम मध्ये घडत असतात.सुरुवातीला तर हे समजून घ्या कि, हृदयविकाराचा झटका का येतो? जेव्हा आपल्या हृदयातल्या माशपेशींमधल्या रक्तवाहिन्यांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्या हृदयाचा ठोका यामध्ये परिणाम होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
बहुतेक वेळा हृदयविकाराचा झटका हा रात्री उशिरा किव्हा पहाटे येतो. असं यामुळे होत कि, जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा मस्तिष्क ला येणारे सिग्नल आपल्या झोपेमध्ये खूप कमी होत जातात. ज्यामुळे आपल्या हृदयातील माशीपेशीतील रक्तवाहिनांमधील रक्त हे हृदयापर्यंत पोहचत नाही आणि मग हृदय हे रक्त संपूर्ण शरीरात पाठवू शकत नाही.
बाथरूममध्ये हृदयविकाराच्या तीव्र घटनेच्या अधिक घटनांमागेही हेच कारण आहे, सामान्यत: बाथरूम मध्ये तापमान हे सामान्य खोल्यांपेक्षा किंचित थंड असते. जर असे हृदयविकाराचे रुग्ण अश्या थंड ठिकाणामध्ये येतात तेव्हा त्यांच्या हृदयाला जास्त काम करावे लागते, कारण कि बाकीच्या शरीरातील रक्तवाहिन्या ह्या सुकून जातात आणि त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहचण्यासाठी हृदयाची जास्त वेळा धड धड होत असते.
आणि हीच हृदयाची जास्त धडधड अश्या रुग्णांना घातक असते.घरांमध्ये शौचालयाचा वापर करताना लोकांना जास्त दबाव किंवा जास्त काळ बसणे आवश्यक असते, ज्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होतो. यामुळे केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्यांनाच परिणाम होत नाही तर रक्तप्रवाहातही बाधा येते. म्हणूनच तुम्ही बऱ्याच वेळा ऐकल असेल कि हिवाळामध्ये हृदयविकार्याच्या झटकणे खूप जण मरण पावले आहेत.