Take a fresh look at your lifestyle.

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक घोटाळा : राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ‘ईडी’कडून अटक

महाअपडेट टीम, 07 मार्च 2021 :- शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहारात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले या चौघांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली असून त्यांना ११ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहार उघड झाल्यांनतर भोसले यांना याच गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पूर्वीच अटक केली आहे. येरवडा कारागृहातून त्यांच्यासह चौघांना आता ‘ईडी’ने अटक केली आहे.

Advertisement

भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आले. मात्र, नंतर त्यांच्या पत्नी रेश्मा या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सहयोगी सदस्य बनल्या.

Advertisement

दरम्यान, ‘ईडी’ने ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर ‘ईडी’ने अनिल भोसले यांच्यासह बँकेचे संचालक सूर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, चीफ अकाउंटंट शैलेश भोसले यांना अटक केली.

Advertisement
Advertisement