Take a fresh look at your lifestyle.

शरीरातील लोहाची कमतरता ओळखता येईल का, लोह वाढवण्यासाठी काय कराल ?

महाअपडेट टीम, 07 मार्च 2021 :-  हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो.

Advertisement

लक्षणे :- थकवा, आळस, निरुत्साह, तोंड आणि ओठ सोलवटणे, गिळण्यास त्रास होणं, पोटाचे विकार, अवयवास बधिरता येणं, उत्सर्जन संस्थेचे दोष, हृदयाची धडधड वाढणं, केस गळणे, त्वचा निस्तेज होऊन निक्रिय होणं, नखं अवाजवी पातळ होणं.

Advertisement

लोह जसं शरीरास चांगलं तसं अतिरिक्त लोहाचं प्रमाण शरीरावर परिणाम करतं. शरीरात लोहाचं प्रमाण आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास त्वचेवर रंगबिरंगी डाग येतात. यकृताचं कार्य बिघडतं. स्वादुपिंडात फायब्रॉटिक वाढ होऊन त्यातून मधुमेह होतो.

Advertisement

उपाय :- फळं : उसाचा रस (लिंबू न पिळता), ब्लू बेरीज, रास बेरीज, आवळा, सुका मेवा, जरदाळू, सफरचंद, पेर, आलुबुखार, केळं, अंजीर.
गोड पदार्थ : रासायनिक गूळ, काकवी.
भाज्या : सर्व हिरवा भाजीपाला, वाटाणा, शेंगदाणा, ब्रोकोली, कमलकंद, फुलकोबीचा पाला, पार्सली (चायनीज भाजी), बीट, बीटची पानं, गाजराची पानं, मुळय़ाची पानं
कच्चे आणि शिजवून खाण्यायोग्य पदार्थ : यीस्ट, बटाटा, मसूर, घरगुती चीज, गव्हांकूर, तांदूळ, ओट्स, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, चुरमुरे, विविध प्रकारच्या लाह्या, केळफूल.

Advertisement
Advertisement