Take a fresh look at your lifestyle.

लिव्हर (यकृत) खराब झालंय हे कसं ओळखाल ?

महाअपडेट टीम, 06 मार्च 2021 :-  डोळ्यांचे पिवळे होणे : यकृत खराब होण्याच्या लक्षणांमध्ये सर्वप्रथम डोळ्यांचा, त्वचेचा आणि नखांचा रंग पिवळा होऊ लागतो. एवढेच नव्हे तर लघवीचा रंगही पिवळसर होतो. डोळे पिवळे होणे असं दर्शवतं की, रक्तात बिलीरूबिनचा स्तर वाढला आणि याच्यामुळे शरीरातील व्यर्थ पदार्थ बाहेर निघू शकत नाही.

Advertisement

ओटीपोटात सूज येणे :- पोटाच्या खालच्या भागात ओटीपोटात सूज येणे जर तुम्हाला ओटीपोटात सूज दिसली तर ते लिव्हर निकामी होण्याचं लक्षण असू शकतं. लिव्हरचं कार्य सतत वाढल्यामुळे ही जळजळ होते. या स्थितीकडे कधीही दुर्लक्ष करू नका आणि तत्काळ डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे.

Advertisement

भूक कमी लागणे :- लिव्हर खराब झाल्याने लिव्हर फेल देखील होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत. अशा प्रकरणात जेथे रोगी फारच अशक्त होतो आणि रक्तवाहिनीच्या माध्यमाने पोषक तत्त्व देण्यात येतात.

Advertisement

त्वचेवर खाज सुटणे :– त्वचेवर खाज सुटणे किंवा रेषेस (लालिमा) येणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे. कारण त्वचेत असणार्‍या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते.

Advertisement

रोगप्रतिकारक शक्ती कुमकुवत होणे :- रक्त लिव्हरमधून जात असतं आणि लिव्हर त्यातून सर्व हानिकारक आणि दूषित घटक काढून टाकतं. परंतु जेव्हा लिव्हर योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा रक्त योग्यप्रकारे साफ होत नाही. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होऊ लागते.

Advertisement

स्मरणशक्ती कमी होणे:- लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम (कन्फ्यूज़न) झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी समस्या होऊ शकतात.

Advertisement
Advertisement