Take a fresh look at your lifestyle.

आश्रमातील संतापजनक घटना: लॉकडाऊनमध्ये तिनं नोकरी गमावली, समस्या घेऊन आश्रमात गेली असता बाबाने बलात्कार करून गळा दाबला !

महाअपडेट टीम, 06 मार्च 2021 :- सुमारे आठवडाभरापूर्वी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात घरातून बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय युवतीची दुग्री फुलनवाल आश्रमातील बाबा संबोध दास यांनी बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. नराधम बाबाने तीच तोंड बंद करण्यासाठी तिची गळा दाबून हत्या करत मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात टाकून शेतात फेकला. पोलिसांनी काल रात्री उशिरा मृतदेह पोस्टमार्टमला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला असून आरोपी बाबा संबोध दास याला अटक करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांनी सांगितले की, पकडलेला अविवाहित आरोपी हा मूळचा बिहारचा असून तो 1991 पासून शहरात राहत होता. तो स्वत: ला बाबा म्हणवत मिरवत होता. घटनेत वापरलेली मोटरसायकल आणि आश्रमात लपून ठेवलेल्या मुलीचा मोबाईल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या मंडळाने मृतदेहाचे पोस्टमार्टम व्हिसेरा तपासणीसाठी पाठवले असून आरोपीला 3 दिवसांच्या पोलिस रिमांडवर घेण्यात आले आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये तरुणीची नोकरी गेल्याने सुमारे 15 दिवसांपूर्वी एका व्यक्तीने तिची ओळख या बाबाशी करून दिली. घटनेपूर्वी तीन वेळा बाबानी तिला जवळच्या आश्रमात बोलावले होते. गेल्या 26 फेब्रुवारी रोजी तिने मुलीला बोलावले होते. बलात्कार व हत्येनंतर आरोपीनी मृतदेह 4 तास आश्रमात ठेवला. नन्तर अंधाराचा फायदा घेत तो प्लास्टिकच्या पोत्यात टाकून 5 किलोमीटर दूर पखोवाल रोडवरील शेतात फेकला गेला.

Advertisement

1991 मध्ये पाचव्या वर्षी शिकत असताना आरोपी संबोध दास घरातून पळाला. लुधियाना गाठल्यानंतर त्यांनी बर्‍याच ठिकाणी काम केले. सर्व ओळखपत्रांवर त्याचा पत्ता दुग्री फेस-थ्रीचा आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी ते दुग्री येथून फुलनवाल एन्क्लेव्ह येथे असलेल्या भूखंडामध्ये एक आश्रम बांधून तेथे राहू लागले. लोक त्याच्याकडे समस्या घेऊन येत असत.

Advertisement
Advertisement