Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह आढळला

महाअपडेट टीम, 05 मार्च 2021 :- रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेलीगाडी सापडली होती, त्या गाडीच्या मालकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या मालकाचा मृतदेह आज मुंब्र्यातल्या रेतीबंदर खाडीत आढळून आला आहे.

Advertisement

मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव असून ते कालपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयाने आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु आज मृतदेह सापडल्याने या संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे.

Advertisement

गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलिसांसमोर हजरही झाले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, माझी गाडी खराब झाल्याने ती रस्त्यात सोडून ओलाने कामासाठी पुढे निघून गेलो होतो.

Advertisement

त्यांनतर गाडी चोरीला गेली होती.  हिरेन मनसुख यांचं ठाण्यात ऑटो पार्टसचं दुकान आहे, ते कामानिमित्त मुंबईला जात असताना, त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग जॅम झालं होतं, म्हणून ते गाडी तेथेच सोडून ओलाने निघून गेले होते.

Advertisement

मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. परंतु आज त्यांचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
Advertisement