Take a fresh look at your lifestyle.

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने चाकूने केले सपासप वार

महाअपडेट टीम, 05 मार्च 2021 :- पालघर जिल्ह्यातील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.

Advertisement

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी आरोपी रुपेश मोरे याने आपल्या ३० वर्षीय पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर लोखंडी सळईने तिच्यावर प्रहार केले. वनिता मोरे असे महिलेचे नाव आहे.

Advertisement

घटनेच्या दिवशी पीडितेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारील उमेश जाधव हे त्यांच्या घरी धावत आले. वनिता या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्या होत्या. त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर जाधव याने तात्काळ पोलिसांना कळवले.

Advertisement

पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तुळिंज पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला गुरुवारी अटक केली.

Advertisement
Advertisement