Take a fresh look at your lifestyle.

CBSE Board Exams 2021: दहावी-बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवीन तारखा एका क्लिकवर

महाअपडेट टीम, 05 मार्च 2021 :- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. सुधारित वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.cbse.nic.in या वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्या वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

Advertisement

नव्या वेळापत्रकानुसार 12वीचा Physics चा चापेपर 13 मे ऐवजी 8 जूनला होणार आहे. याशिवाय इतिहास आणि बँकिंग पेपरची तारीखही बदलण्यात आली आहे. ही तारीख विद्यार्थ्यांना वेबसाईटवर देखील पाहता येणार आहे.

Advertisement

दहावीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. यानुसार दहावीचा सायन्सचा पेपर २१ मे आणि मॅथ्सचा पेपर २ जून रोजी होईल. याशिवाय बोर्डाने कला शाखेसाठीही वेळापत्रकात बदल केला आहे. यानुसार, भूगोलाचा आधी २ जून रोजी असणारा पेपर आता ३ जूनला आयोजित केला जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 2 वेळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.

Advertisement

पहिल्या टप्प्यात ही 10.30 वाजता सुरु होऊन दुपारी 1.30 पर्यंत चालेल. सर्व उमेदवारांना सकाळी 10-10.15 च्या दरम्यान एक बुकलेट देण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 2.30 ते 5.30 या वेळेत पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर 2.15 पर्य़ंत पोहोचणं अनिवार्य आहे.

Advertisement

सीबीएसई बोर्डाची परीक्षा 4 मेपासून सुरू होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 7 जून रोजी तर 12 वीची परीक्षा 11 जूनपर्यंत संपेल अशी माहिती CBSE बोर्डाकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement