Take a fresh look at your lifestyle.

संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेनं झुकली, चक्क पोलिसांनी तरुणींना उघडं करून नाचायला लावलं !

महाअपडेट टीम, 03 मार्च 2021 :-  जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात संतापजनक प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या बाहेरच्या पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.त्याबाबत त्यांनी एक व्हिडिओही जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, गणेश कॉलनीतील आशादीप महिला वसतिगृहात महिला व बालकल्याण विभागामार्फत निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. म्हणून जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठले. त्या ठिकाणी महिला व मुलींना विश्वासात घेतले.

Advertisement

या प्रकरणात तक्रार करणाऱ्या करणारी मुली आणि महिलांवर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण जननायक फाउंडेशनच्या सदस्यांसमोर त्यांचे काही चालले नाही. त्यांनतर त्या सर्वांनी सांगितले की, १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी आम्हाला कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन आमच्यासोबत अनैतिक कृत्य केले जात असल्याची आपबिती सांगितली.

Advertisement

ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जात होती. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरूनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.

Advertisement
Advertisement