Take a fresh look at your lifestyle.

चेहर्‍यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘हे’ साधे-सोपे घरगुती उपाय करा अन् फरक पहा

महाअपडेट टीम, 3 मार्च 2021 :- जर तुम्हाला चेहऱ्यावरील काळे डाग व मुरमामुळे त्रास झाला असेल तर हे काही घरगुती उपचार सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही सुटका करू शकता.

Advertisement

बेसण पीठ आणि हळद – २ चमचे बेसण पिठात एक चिमूटभर हळद घाला आणि एक पेस्ट बनवा, पेस्ट चांगली घट्ट केल्यांनतर तोंडावर लावा आणि 15 मिनिटे तशिच ठेवा, नंतर स्वच्छ
कोमट पाण्याने धुवा. दिवसातून एकदा हे केल्याने, आपल्या चेहर्यावरील सर्व डाग काही दिवसात दूर होतील.

Advertisement

बटाट्याचा रस आणि हळद – १ बटाट्याची एक साल किसून घ्या. व त्याचा रस बनवा. त्यात एक चिमूटभर हळद घालावी व एक पेस्ट बनवा आणि ज्या ठिकाणी मुरुमे, काळे डाग असतील तिथे १० मिनिटे लावून ठेवा. हा प्रयोग दिवसातून १० दोनदा करावा. सर्व मुरमे, काळे डाग 10 दिवसात निघून जातील.

Advertisement

लिंबू किंवा गुलाब पाणी – तुम्ही लिंबू देखील वापरू शकता, एक लिंबू कापून आपल्या चेहऱ्यावर मुरमाच्या ठिकाणी घासा, जर तुमचा चेहरा संवेदनशील असेल तर तुम्ही लिंबावर गुलाबाचे पाणी टाकूनही वापरू शकता.

Advertisement
Advertisement