Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! थकीत वीज बील कनेक्शन तोडणीला स्थगिती; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा

महाअपडेट टीम, 2 मार्च 2021 :- कोरोना काळात वाढीव वीजबिलावरुन राज्यभरात भाजपनं आंदोलन केले होते. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपानं केली.

Advertisement

त्या पार्शवभूमीवर आज विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्र घेतला होता.तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले होते.

Advertisement

सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले कि, जोपर्यंत विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही अजित पवारांनी विधानसभेत दिली.

Advertisement

अजित पवारांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले. ज्या नागरिकांची वीज कनेक्शन तोडली आहेत त्याची परत जोडणी करून द्यावी. तसेच सर्वांना सामान्य न्याय द्यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Advertisement
Advertisement