Take a fresh look at your lifestyle.

गौप्यस्फोट : संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन त्यांच तोंड बंद केलंय, पैशासाठी जावा जावांची भांडण सुरु…,

महाअपडेट टीम, 1 मार्च 2021 :-  वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही हे प्रकरण शांत न होता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी वनमंत्री संजय राठोड आणि पूजाच्या आई-वडिलांवर खळबळजनक आरोप केला आहे.

Advertisement

‘पूजा चव्हाण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना तब्बल पाच कोटी रूपये ५ कोटी रुपये मिळाले आहेत,’ तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी तिच्या आईवडिलांवर खूप दबाव टाकण्यात आला आहे.या संदर्भात शांताबाई राठोड यांनी एक व्हिडीओ शेअर करत पूजाच्या आई वडिलांवरच गंभीर आरोप केले आहे.

Advertisement

मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काल पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.आमच्या मुलीच्या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून तिला योग्य न्याय द्यावा, केवळ संशयावरून कोणाचेही नुकसान होऊ नये, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडं व्यक्त केली.

Advertisement

या भेटींनंतरच पूजा राठोड ची चुलत आजीने आई-वडिलांवर पैसे घेऊन प्रकरण मिटवत असल्याचा आरोप केला आहे. ‘मी पुज्याची चुलत आजी आहे,त्यामुळं माझं कोणी ऐकणार नाही. ‘पूजाच्या आई-वडिलांनाहि लेकराची किंमत नाही’, संजयभाऊ राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे.

Advertisement

त्यांनी ते पाच कोटी रुपये पुरून ठेवले आहेत. त्यांच्या घरात जावया-जावयांमध्ये भांडण सुरू आहेत. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाला योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंतीही शांता राठोड यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्यात न भुलता योग्य तपास करून पूजाला न्याय मिळवून द्यावा,’ अशी विनंती शांताबाई राठोड यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement