Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : मोदीं पाठोपाठ शरद पवारांनीही टोचली कोरोना लस, बनले महाराष्ट्रातील पहिले नेते

महाअपडेट टीम, 1 मार्च 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. आज कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा झाला सुरू आहे.यात 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ शरद पवारांनीही जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे.

Advertisement

शरद पवारांसोबत त्यांची मुलगी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील होत्या. लसीकरणादरम्यान जे.जे. हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाणेदेखील पवारांसोबत उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती.

Advertisement

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. जे.जे. रुग्णालयातील कोरोना लसीकरण मोहीम संथ गतीने सुरु होती. मात्र, आता शरद पवार यांनी जे.जे. रुग्णालयात येऊन कोरोना लस घेतल्याचे लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील लसीकरण मोहीम वेग पकडू शकते.

Advertisement
Advertisement