Take a fresh look at your lifestyle.

अमानवी कृत्य ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे गुप्तांग, नाक कापले, कारण ऐकून धक्का बसेल !

महाअपडेट टीम, 1 मार्च 2021 :- १४ वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील कलबुर्गीमधील नारीबोलमध्ये घडला आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाइकासह दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारीबोल येथील मुलगा सरकारी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. शेजारच्याच कॉलनीतील एका १४ वर्षीय मुलीसोबत त्याची मैत्री होती. तिच्या आईचा त्यांच्या मैत्रीला विरोध असल्याने त्याला परिसरात येण्यास आणि मुलीला भेटण्यास मनाई केली होती. परंतु मुलाने त्याकडे दुर्लक्ष करत तिला भेटण्याचा प्रयत्न करत असे.

Advertisement

त्यामुळे मुलीच्या आईने त्याचे नाव मुलीच्या काकांना सांगितले. मुलीच्या काकाने बहाणा करत त्याला बोलावून घेत गावाबाहेर नेले. काकांसोबत गेल्यानंतर तो घरी परतलाच नाही. मुलाच्या कुटुंबियांनी त्याला सर्वत्र शोधले तरीही तो मिळाला नाही. दरम्यान पाच दिवसांनंतर मुलाच्या घरापासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीपात्रात गावकऱ्यांनी बॅग तरंगताना बघितली.

Advertisement

त्यानंतर पोलिसांनी नदीतून बॅग बाहेर काढली. त्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसांनी मृताची ओळख पटवली. मुलाची हत्या करण्यापूर्वी त्याचे नाक आणि गुप्तांग कापलेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Advertisement