Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरुन आधी पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार केले, नंतर गळफास घेऊन स्वतःला संपवल !

महाअपडेट टीम, 1 मार्च 2021 :-  चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे. त्यानंतर आरोपी पतीने घरातच लगेच स्वतः साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तुकाराम कोरे हा रिक्षाचालक असून मांगडेवाडी परिसरात दोन पत्नींसोबत राहत होता. त्याच्या दोन्ही पत्नी या सख्ख्या बहिणी आहेत. नऊ महिन्यांपूर्वी तुकाराम याने जगदेवी यांच्या बहिणीसोबत घरातच गळ्यात हार घालून विवाह केला होता. परंतु गेल्या तीन महिन्यापासून तुकाराम हा त्याची दुसरी पत्नी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

Advertisement

शनिवारी रात्री त्यांचे याच कारणावरून भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने अनिता हिच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर त्याच घरात साडी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.शनिवारी सकाळी दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

अनिता तुकाराम कोरे (वय 32) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर तुकाराम गंगाराम कोरे (वय 40) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

Advertisement
Advertisement