Advertisement

ऐकावं ते नवलच! 11 हजाराच्या बुटावर केलंय असं काही की, तो विकला गेलाय तब्बल 7 कोटींना

Advertisement

महाअपडेट टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- 11000 रुपयांच्या बुटाचे रूपांतर सात कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे महागड्या बुटात कसे झाले? – बुटाची किंमत ऐकायला थोडी विचित्र वाटत असेल ना (A Expensive Shoes) ! पण हे खर आहे. खरेदीदाराने त्याला विकत घेतलं आहे.

Advertisement

आपण १, २ किंवा ३-४ हजार रुपयांच्या बुट घेताना १० वेळा विचार करतो. कोट्यवधी रुपयांचा बूट कोणी का विकत घेईल, हा प्रश्न तुम्हला पडला असणं परंतु हा बूट काही वैशिष्ट्यपूर्ण होता. म्हणून तो सात कोटी रुपयांना विकला गेला आणि खरेदीही करण्यात आला. त्यामुळे त्या बुटात असं काय होतं की त्याची बोली करोडो रुपयांत झाली, आपल्याला त्या बुटाचे वैशिष्ट्य माहीत आहे का? हे जाणून घेणं खूप मजेशीर ठरणार आहे.

Advertisement

बुटांचा लिलाव – (British-American) लिलाव गृह – ‘Sotheby’s Home’- जिथे गेल्या वर्षी बुटांचा लिलाव करण्यात आला होता. या बुटाची किंमत सुमारे १० लाख डॉलर्स इतकी जाहीर करण्यात आली. आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी हे धक्कादायक असले तरी लिलावासाठी बसलेल्या व्यक्तिकडून किंमत नाही तर गुणवत्ता पहिली जाते.मग त्यांनी तो बुट विकत घेण्याचा विचार केला.

Advertisement

बुटांवरील नक्षीकाम आणि अनेक प्रकारची कलाकुसर हि बाब समजु शकतो. पण बुटांवर चित्रं आहेत. यामुळे या बुटाची जास्तीची किंमत मोजावी लागली. खरोखर, बुटावरील पुष्पचित्र त्याचे सौंदर्य वाढवण्याच काम करत होते,जे इतर कोणत्याही बुटांवर दिसत नाही.

Advertisement

दोन ते चार हजार रुपयांचे बूट खरेदी करताना आपण बुट बनवणाऱ्या ब्रँडबद्दल सगळी शहानिशा करून निर्णय घेतो. तर या तयार होणाऱ्या लाखोंच्या बुटांबद्दल तुम्हाला जाणून घेणे तुम्हाला का आवडणार नाही? मिळालेल्या माहितीनुसार, हा महागडा बूट आदिदास (Adidas ) आणि मिसेन (Meissen) या प्रसिद्ध बूट उत्पादक ब्रँडने एकत्रित येऊन बनवला आहे.

Advertisement

आपल्यासाठी आदिदास हे एक परिचित नाव आहे, पण मिस्सेन नाही. त्यामुळे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. मिसेन हे एक जर्मनीच आर्ट हाऊस आहे. इथे तुम्हाला गृहसजावटीसाठी सर्वकाही सापडेल. त्या वस्तूंवर विविध प्रकारच्या कलाकृती आहेत. ही या सभागृहाची ओळख आहे जी याला खास बनवते. म्हणूनच इथल्या वस्तूंची किंमत खूप जास्त आहे.

Advertisement

बुटा ची मूळ किंमत होती 11,000 – होय, हा कलाकारी बुट बनवण्यासाठी Adidas originals ZX8000 खरेदी करण्यात आला होता. त्यावर कलाकाराने आपली जादू दाखवली. shop.adidas.co.in वेबसाईटनुसार या बुटाची किंमत 10,999 रुपये आहे. जे तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. हँड पेंटिंगच्या माध्यमातून या हजारो बुटांचे कोट्यवधी रुपयांत रूपांतर कसे झाले ते पाहू शकता.

Advertisement

बूट कुठे ठेवला आहे? – ह्या बुटाचा वापर कोणीही केलेला नाहीये, तो एका काचेच्या आत पॅक केला आहे. त्याचा वापर हा म्युझिअमच्या सजावटीसाठी केला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

कोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा सल्ला

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- कोरोना संकटात अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या ब्राझीलने महिलांना गर्भधारणा…

1 hour ago

दिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि ऑक्सिजनची मागणी

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- कोरोना महामारीच्या लाटेत राजधानी दिल्लीतील बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने…

2 hours ago

ममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता…

2 hours ago

मॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- मॅकडोनाल्‍ड इंडियाने (पश्चिम व दक्षिण) त्‍यांच्‍या प्रमुख जाहिराती मोहिमांसाठी ब्रॅण्‍ड…

3 hours ago

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- देशभरात सर्वत्र कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून…

3 hours ago

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी लागू करा : कपिल सिब्बल

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी…

3 hours ago