Take a fresh look at your lifestyle.

…राजीनामा दिला म्हणजे त्यांना निर्दोषत्व बहाल झालं असं होत नाही !

महाअपडेट टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.   त्याआधी विरोधक संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड आक्रमक झाले होते. राजीनाम्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला होता.

Advertisement

अखेर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

Advertisement

आता यावर विधानपरिषदेचे नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट करत म्हटलंय की, संशयित आरोपी संजय राठोड यांनी राजीनामा दिला म्हणजे निर्दोषत्व बहाल झालं?, असं होतं नाही. पूजा चव्हाणची ‘आत्महत्या की हत्या?’ या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच अनुत्तरित असलेल्या प्रश्नांची उत्तरे यांना द्यावीच लागणार आहेत. अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्येचं प्रकरण हे महिलेच्या सुरक्षतेशी निगडीत असून यामधलं खरं सत्य आणि तथ्य समोर आलं पाहिजे, त्यामुळे संजय राठोड यांची कठोर चौकशी करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement