Take a fresh look at your lifestyle.

दूध व मधात रोज ४ ते ५ पिस्त्यांचे अनुशापोटी सेवन केल्यास शरीराला मिळतील हे १० गजब फायदे

महाअपडेट टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- पिस्ता हे छोटं, चविष्ट, कठीण कवचाचं पौष्टिक फळ आहे.पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे.पिस्त्याचं पीक हे इराण, सीरिया, टय़ूनिशिया, पॅलेस्टाईन, मेसो पोटेमिया, तुर्कस्तान, फ्रान्स, अफगाणिस्तान व अमेरिका या ठिकाणी घेतलं जातं. 

Advertisement

पिस्ते गोड आणि पौष्टिक असतात. त्यात पाणी कमी व उरलेला भाग मूल्यवान अन्नघटकांचा असतो. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.

Advertisement

अशक्तपणावर पिस्ते हे टॉनिक म्हणून उत्तम आहे. स्मृतिभ्रंश,  विस्मरण जाणवत असेल तर नियमितपणे ४ ते ५ पिस्ते दुधात टाकून खावेत.
दूध व मध एकत्र करून त्यात ५ पिस्ते घालून अनुशापोटी  प्यायल्यास मज्जातंतूंना ते चांगले टॉनिक आहे. याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.
हृदयाचे स्नायू मजबूत होतात व जंतूसंसर्गाचा प्रतिकार होतो.
विपुल प्रमाणात लोह असल्याने पिस्त्यामुळे रक्त वाढतं.
नियमित सेवन केल्यास अशक्तपणावर मात केली जाते.
पिस्त्याच्या गराबाहेरच्या सालीचा उलटय़ा थांबवणे, पोटदुखी घालवणे आणि बद्धकोष्ठ नाहीसा करणे यावर उपयोग होतो. पचन संस्थाही सुधारते.
पिस्त्याच्या फुलांमुळे श्वासनलिकेत जमणारा कफ दूर होतो. तसंच जुनाट खोकला, दमा, धाप, यांवर ही फुले गुणकारी ठरतात.
पिस्ते आशियातील व युरोपातील देशांत खारवून मुखशुद्धी म्हणून हातांनी सोलून खातात.
महाग मिठाईत चवीसाठी व शोभेसाठी पिस्त्याचे काप काढून घालतात. आइस्क्रीम, केक, बिस्किटे यांतही पिस्ते वापरतात.
खारवलेले पिस्ते चवदार लागले तरी अन्न म्हणून ते मीठ घातल्याने आरोग्यास विघातक आहेत.
पिस्ते हे नुसतेच खाल्ले तर मात्र ते शक्तिदायक, आरोग्यदायी व पौष्टिक असतात.

Advertisement
Advertisement