Advertisement

बहुगुणी पालक ! हे ५ फायदे वाचून व्हाल थक्क

Advertisement

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पालेभाज्यात सर्वात स्वस्त असलेली भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते.म्हणूनच पालक भाजीला जगातील निवडक आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे. पालकाच्या पानांमध्ये आणि रंगात आरोग्याचे अनेक रहस्य दडलेले आहेत. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी पालक खायला हवी.

Advertisement

अँटिऑक्सिडंट्स – पालकामध्ये मोठय़ा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे शरीराची ऑक्सिडेशनची प्रक्रिया नियंत्रित राहते.

Advertisement

आजारापासून बचाव – पालकाच्या भाजीत असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयाच्या स्नायूंना मजबुती देतात आणि कार्डिओव्हेस्क्युलर आजारांशी लढा देतात. याशिवाय हे अँटिऑक्सिडंट्स हायपरलिपिडिमिया (रक्तात सर्वाधिक प्रमाणात फॅट किंवा लिपिड जमा होणे), हार्ट फेल आणि कोरोनरी हार्ट यासारख्या आजारांपासून व्यक्तीचे संरक्षण करतात.

Advertisement

ल्यूटिन – पालकाच्या भाजीमध्ये आढळून येणारा ल्यूटिन नावाचा पिवळा पिगमेंट पानांशिवाय अंड्याच्या बलकातही आढळून येतो. ल्यूटिन अँथेरोस्क्लेरॉसिस नामक आजारापासून बचाव करतो. हा आजार आर्टलरीजमध्ये सर्वाधिक फॅट जमा झाल्यामुळे होतो. याशिवाय स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकासुद्धा पालकामुळे कमी होतो.

Advertisement

हाडे बळकट – पालकात असलेले ‘के’ व्हिटॅमिन कॅल्शियमचे प्रमाण राखण्यास मदत करतो. यामुळे हाडे बळकट होतात आणि ऑस्टियोपोरोसिससारखे आजार दूर राहतात. पालकामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फिटोन्यूट्रियंट्स असतात. यामुळे लहान मुलांची चांगली वाढ होते. त्यासाठी मुलांच्या जेवणात पालकाचा अवश्य समावेश केला पाहिजे.

Advertisement

फॉलेट – फॉलेटसोबतच पालकाच्या भाजीत टोकोफेरोल आणि क्लोरोफिलीनदेखील आढळून येते. हे तिन्ही घटक मिळून गॉल ब्लॅडर कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि लंग कॅन्सरपासून बचाव करतात.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

COVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा

महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…

9 hours ago

पैसाच पैसा : पोस्ट ऑफिसची ही योजना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, वाचा अन फायदा घ्या !

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…

1 day ago

अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…

1 day ago

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या…

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…

3 days ago