कोमट दुधात फक्त 1 चमचा हे चूर्ण टाकून प्या; काय होईल एकदा वाचून तर पहा !
महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- शतावरी पाचक, अँटी-युक्लीअर, अँटी-ऑक्सिडंट व अँटी-कँसर घटक म्हणून काम करते. आयुर्वेदामध्ये शतावरीला स्त्रियांसाठी शक्तीवर्धक औषध मानले आहे. आयुर्वेदात शतावरी वनस्पतीचे महत्त्व खूपच आहे. स्त्रियांशी निगडीत आजार दूर करण्याबरोबरच शतावरीचे अनेक उपयोग आहेत. शतावरी म्हणजे ‘शत-आवरी’ म्हणजेच ‘१०० नर ताब्यात असलेली नार’ असा होतो.
गरम दुधात 1 चमचा शतावरी घाला आणि हे दूध प्या.
शतावरीमुळेही पचनशक्ती सुधारते. शतावरी अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक वनौषधी आहे. यामुळे पचनशक्ती सुधारते. चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
शतावरी महिलांसाठीच्या फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. ती त्यांची लैंगिक क्षमता वाढवते, हार्मोन्सला संतुलित करते आणि प्रजननक्षमता सुधारते. बहुतांश महिलांना मासिक पाळी येण्यापूर्वी खूप त्रास होतो.
पाळीदरम्यान पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवत असतील तर शतावरी घेतल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. बाळंतीण स्त्रियांना दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढवण्यासाठी शतावरी उपयोगी आहे.
शतावरीच्या मुळया दूधात वाटून लावल्यास स्तन वृध्दीसाठी त्याचा उपयोग होतो.
अजूनही हे आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या – आवळ्याच्या नियमित सेवनामुळे चयापचय क्रिया सुधारेल. यासोबतच सर्वांगीण आरोग्य उत्तम राहील. केसांच्या वाढीसाठीही आवळा उपयुक्त ठरतो. आवळ्याच्या रसानेही लाभ होऊ शकेल. त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश करा.
अश्वगंधाचे बरेच लाभ आहेत. अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे चयापयच क्रिया सुधारते. यासाठी अश्वगंधाची पूड आहारातून घ्या. ही पूड कणकेत किंवा चहात घालता येईल.
ज्येष्ठमधामुळेही चयापयच क्रियेचा वेग वाढतो. यासाठी दररोज एक ते पाच ग्रॅम ज्येष्ठमधाचं सेवन करता येईल. ज्येष्ठमधामुळे ताण कमी व्हायला मदत होते. स्मरणशक्ती सुधारते. मानसिक आरोग्यही उत्तम रहातं. ज्येष्ठमधामुळे पचनसंस्थेलाही थंडावा मिळतो.
जायफळही औषधी आहे. आहारात मर्यादित प्रमाणात जायफळाचा समावेश करायला हवा. कॉफीमध्ये जायफळ घातलं जातं. जायफळ घातलेलं दूधही पिता येईल. यामुळे शांत झोपही लागेल.