पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?
महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले आहेत. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर विरोधक सतत टीका करत आहे.
तसेच पंधरा दिवसांनंतर जनतेसमोर येऊन संजय राठोड यांनी मंगळवारी यवतमाळमधील दिग्रसमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं, त्यामुळेही विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का ? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सह्याद्री अतिथिगृहावर कॅबिनेट बैठक बोलावली होती, परंतु बैठकीत संजय राठोड यांच्याबाबदल कोणतीही चर्चा झालेली नव्हती. त्यांमुळे बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री संजय राठोड विषयावरून नाराज असल्याचं बोललं जात आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय निर्णय घेताय हे राजकीयदृष्ट्या महत्वाचं असणार आहे.