Take a fresh look at your lifestyle.

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याआधी मैदानाचं नाव बदलण्यात आल्याने काँगेससह विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना केली आहे. “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे

Advertisement

अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम हे म्हणून सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असं करण्यात आलं होतं. परंतु तिसर्‍या कसोटी सामन्याआधी या स्टेडियमच उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जय शहा यांच्या उपस्थितीत मैदानाचं नाव बदलून हे नरेंद्र मोदी स्टेडियम असं देण्यात आलं आहे. यावरून जितेंद्र आव्हाडांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Advertisement

“स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Advertisement
Advertisement