Take a fresh look at your lifestyle.

एक चमचा मोहरीचं तेल तुमच्यासाठी काय-काय करू शकतं?, एकदा वाचून पहा !

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :-  मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात करा किंवा औषधाच्या रुपात हे प्रत्येक रुपात फायदेशीर ठरते. हिंदीमध्ये मोहरीला सरसों का तेल म्हटले जाते. मोहरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत शिवाय मोहरीच तेलही तेवढंच गुणकारी आहे. त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे. तसेच मोहरीच्या तेलात असे अनेक पोषकतत्त्व असतात जे आपल्या आरोग्य, केस आणि स्किनवर फायदेशीर असतात.

Advertisement

मोहरीच्या तेलामध्ये वेदानाशामक गुण आढळून येतात, कान दुखत असल्यास दोन थेंब कोमट मोहरीचे तेल कानात टाकावे. यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकू शकता.

Advertisement

चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स, सुरकुत्या पडल्या असतील तर मोहरीचे तेल अत्यंत उपयुक्त आहे. या तेलाने मालिश केल्यास त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतील आणि चेहरा उजळेल. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचा उजळेल.

Advertisement

मोहरीच्या तेलाने सौंदर्य वाढते. गोरा रंग प्राप्त करू इच्छित असलेल्या लोकांनी डाळीचे पीठ, हळद यामध्ये मोहरीचे तेल टाकून पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर लावावी.

Advertisement

मोहरीचे तेल हृदयाला तंदुरुस्त ठेवते काही दिवसांपूर्वी एम्स, हावर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायन्स आणि सेंट जॉन मेडिकल कॉलेजमध्ये केलेल्या एका रिसर्चनुसार मोहरीचे तेल खाणाऱ्या 71 टक्के लोकांना हृदयाचे आजार झाले नाहीत.

Advertisement

कंबर दुखीचा त्रास असल्यास मोहरीच्या तेलामध्ये थोडासा हिंग, ओवा आणि लसुन मिसळून गरम करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण कंबरेवर लावा. या उपायाने कंबर दुखीचा त्रास कमी होईल.

Advertisement

नवजात शिशूची मोहरीच्या तेलाने मालिश करणे उत्तम राहते. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर स्नान घातल्याने बाळाला सर्दी होण्याची शक्यता राहत नाही आणि सर्दी झालेली असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास सर्दी दूर होईल.

Advertisement

तसंच यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी एसिडमुळेही सांधेदुखी आणि गाठींसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

Advertisement
Advertisement