Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमचं नाव बदललं, अमित शहांनी केली मोदींच्या नावाची घोषणा

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- अहमदाबादमधील प्रसिद्ध जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. या नव्या स्टेडियमचे उद्घाटन बुधवारी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी मोदींच्या नावाची घोषणा केली.

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा तिसरा कसोटी सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. तत्पूर्वी या स्टेडियमचं नाव सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावावर होतं. दरम्यान अमित शहांनी उदघाटनावेळी मोदींच्या नावाची घोषणा केली.

Advertisement

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या गुजरातमध्ये दौऱ्यावर दाखल होऊन त्यांच्या पत्नीसमवेत सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचे भूमिपूजन केले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियमवर संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Advertisement

या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. एक लाख दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासची क्षमता या स्टेडियम मध्ये आहे. फक्त हेच नाही, ड्रेनेज सिस्टम देखील चांगली आहे जी 30 मिनिटांत खेळपट्टी कोरडे करू शकते. याशिवाय, स्टेडियममध्ये 11 खेळपट्ट्या आहेत, त्यातील 6 लाल मातीने बनविलेल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement