Take a fresh look at your lifestyle.

स्टिव्ह जॉब्स यांच्या यशाचे सीक्रेट जाणून घ्या, तुमच्याही आयुष्यात नक्कीच बदल घडेल !

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- स्टिव्ह जॉब्स यांना व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे अवलिया म्हणून ओळखले गेले. iPhone, iPad, iPod हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्यांच्यामुळेच बाजारात आली. स्टीव्ह जॉब्सना सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःला वाहून घेतले होते.

Advertisement

अफाट कल्पनाशक्ती व अपार कष्ट या जोरावर ज्यांनी जगात स्वतःचा कायमचा ठसा उमटवला त्या स्टिव्ह जॉब्स यांचे काही यशस्वी होण्याचे सिक्रेट नियम जरूर तुमच्याही आयुष्यात नक्कीच बदल घडवतील. वाचा, जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडले ते 6 नियम. जे तुम्हालाही success मिळवून देतील.

Advertisement

1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते – मित्रांनो, तुम्ही आज कुठले ही क्षेत्र घ्या, वरवर पाहता ते खूप सोप्पे वाटते. पण जसे जसे तुम्ही त्यात डीप मध्ये जाता तेंव्हा तुम्हाला कळते की त्या कामात खूप अडचणी आहेत. त्यात देखील खूप कौशल्य लागतात. अश्या वेळी जर तुम्हाला तुमच्या कामाचा प्रती उत्कटता नसेल, प्रेम नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी ना तोंड देऊच शकणार नाही.

Advertisement

म्हणूनच अडचणी च्या वेळी तुमचं त्या कामाच्या प्रति किती आवड आहे हेच ठरवते की तुम्ही त्या क्षेत्रात रहाणार कि नाही. थोडक्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल. तर तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.

Advertisement

2) वेगळे विचार करा – बराच वेळा आपण ते करतो जे सर्व लोक करत आहेत. आपण मळलेल्या वाटांवरच चालणे जास्ती पसंत करतो. कारण नव्या वेगळ्या वाट शोधणे आणि त्या वर चालणे आपल्याला असुरक्षित वाटते किंवा आपण भितो नवीण वाटेवर चालायला.

Advertisement

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर ते मिळवायचे असेल जे कोणी आज पर्यंत मिळवले नसेल तर तुम्हालाही ते करावं लागेल जे आज पर्यंत कोणी कधी केली नसेल. ईतर लोकांनी जे केलं, जी वाट शोधली त्याच वाटेवर तुम्ही गेलात तर तुम्ही देखील तिकडेच जाल जिकडे ते गेले. त्यात नाविन्य ते काय.

Advertisement

स्टिव्ह जॉब्स कॉम्प्युटर बनवायचे, मोबाईल इत्यादी अनेक गोष्टी ते हयातीत असताना अॅपल ने बनवले. या सर्व गोष्टी काय नवीन होत्या? अजिबात नाही, पण आपण बघतो अॅपल आणि बाकी कंपनी मधील फरक. येथे वेगळा विचार म्हणजे नाविनच काही तरी केले पाहिजे असा होत नाही तर सगळे जे करतात त्याचा पेक्षा आपण वेगळे करायला पाहिजे. लक्षात ठेवा “विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.”

Advertisement

3) पहिले पाऊल टाका – पहिले पाऊल टाकणे हेच कधी कधी सर्वात अवघड काम बनते, तेव्हा ते पाऊल टाका आणि अंतर्मनचे ऐका, ध्येर्य बाळगा. जेंव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेंव्हा तुम्हांला दुसरे पाऊल कुठे टाकायचे हे तुम्हांला लक्षात येईल.

Advertisement

कोठे तरी वाचले होते कि एक व्यक्तीने त्याच्या देशाचे संपूर्ण भ्रमण केले होते ते देखील सायकल चालवत. या त्याचा पराक्रमा नंतर पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. त्या मुलाखती मध्ये त्यांनी त्या व्यक्तीला विचारले की तुम्हाला या प्रवासात सर्वात जास्ती कोणती गोष्ट अवघड वाटली. त्या वर त्या व्यक्तीचे उत्तर होते की घरचा उंबरटा ओलांडणे सर्वात आवघड वाटले. एखाद्या कामाची सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आणि अवघड काम असते.

Advertisement

4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा – स्टिव्ह जॉब्स आणि त्याचा मित्र स्टिव्ह वॉझनिएक या दोघांनी अॅपल कंपनी ची स्थापना एका गॅरेजमध्ये केली होती. त्यां दोघांना त्यांचा पहिला कॉम्प्युटर ‘अॅपल -1’ बनवण्या साठी 1000 डॉलर्स ची गरज होती ती त्या दोघांनी त्यांचा आवडत्या गोष्टी विकून मिळवल्या होत्या. आज तुम्हाला सांगायची गरज नाही की अप्पल कंपनी कुठे बाकी कंपनी च्या तुलनेत. म्हणून स्टिव्ह म्हणाले “एका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा.”

Advertisement

5) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका – जगात सर्वात मोठी गोष्ट जी माणसाला यशा पासून दूर ठेवते ती म्हणजे लोक काय म्हणतील. आपण बऱ्याच वेळा एखादे काम, लोक काय म्हणतील हाच विचार करून करत नाही. लोक आपल्या प्रति काय विचार करतात हे तुम्हाला विचार करायची काहीच गरज नसते. लोकांचा या भाऊ गर्दीत तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज हरवू नका देऊ.

Advertisement

नेहमी मनातले करा, ज्यात तुमची आवड असेल ते करा. अगदी मन मोकळे बिंदास कोणाची तमा न बाळगता. आणि लोकांन साठी हे हिंदी गाणे म्हणा ‘कुछ तो लोग कहेंगे! लोगोका काम हे केहना.

Advertisement
Advertisement