Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी ! क्रिकेटमध्येही कोरोनाचा कहर, 3 भारतीय क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम 23 फेब्रुवारी 2021 :- कोरोनाच्या माहामारीमुळे संपूर्ण जगावर संकट ओढावलं आहे. सर्व देश या विषाणूविरोधात लढत आहेत. कोरोनामुळे जगाचं खूप मोठं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत भारतातील घरगुती वन-डे स्पर्धेतील विजय हजारे ट्रॉफीच्या तीन संघांपैकी प्रत्येकी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

हे खेळाडू बिहार, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील आहेत. तिन्ही खेळाडू सध्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सर्व संघांच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट दोन आठवड्यांपूर्वी घेण्यात आली होती. महाराष्ट्र आणि हिमाचलचे संघ आपापले सामने जयपूरमध्ये खेळत आहेत आणि बिहारचे सामने सामने हे बेंगलोरमध्ये खेळले जात आहे.

Advertisement

बिहार संघातील एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आहे.असे असूनही, 22 फेब्रुवारी रोजी बिहार आणि कर्नाटकला सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता या दोन्ही संघांची पुन्हा चाचणी होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून प्रत्येकजणाला चाचणी होईपर्यंत त्याच्या खोलीतच राहण्यास सांगितले गेले आहे. खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाणार आहे.

Advertisement

बिहार टीम ही विजय हजारे ट्रॉफीच्या ग्रुप सीचा भाग आहे. या गटात बिहारसह कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिशा आणि रेल्वे हे संघ आहेत.

Advertisement

विजय हजारे ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. बीसीसीआयने तिन्ही वेळा कोरोना चाचणी घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला बायो बबलमध्ये राहावे लागत आहे. बायो बबलचा अर्थ असा आहे की खेळाडू हे फक्त एकाच ठिकाणी राहू शकतात. ते कोठेही जाऊ शकत नाही, किंवा बाहेरील कोणीही त्याला भेटू शकत नाही. ज्या हॉटेल हॉटेलमध्ये खेळाडू राहत आहेत त्या स्टाफलाही बाहेर जाता येत नाही. आणि जर कोणी चुकून बाहेर आला तर तो पुन्हा आत येऊ शकत नाही.

Advertisement
Advertisement