Take a fresh look at your lifestyle.

दुचाकीवरून खाली पडताच बिबट्याने पत्नी व मुलीवर हल्ला चढवला, पतीने 20 मिनिटे कडवी झुंज दिली, पण…

महाअपडेट टीम 23 फेब्रुवारी 2021 : – कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घडले असे की, एका व्यक्तीने सुमारे 20 मिनिटे बिबट्याशी लढा देत अखेर त्याला ठार मारले आहे. हसन जिल्ह्यातील हरिसकेरे तालुक्यातील बांदकरे भागात ही अंगावर काटा आणणारी ही घटना घडली असून सध्या कुटुंबातील तिन्ही व्यक्तींवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की. राजगोपाल नायक पत्नी व मुलीसह दुचाकीवरून जात होते. दरम्यान, रस्त्यावरून जात असताना एका बिबट्याने तिन्ही जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जण रस्त्यावर पडले. दुचाकीवरून खाली पडताच बिबट्याने महिला आणि तिच्या मुलीवर हल्ला केला.

Advertisement

यावेळी राजगोपाल आपली पत्नी व मुलीला अक्षरक्ष: मृत्यूच्या जबड्यातून ओढून बिबट्याशी सुमारे 20 मिनिटे रक्तबंबाळ अवस्थेत लढा देत राहिला. अखेर बर्‍याच संघर्षानंतर त्याने बिबट्याच्या जबड्यात हात घालून त्याला अक्षरशः फाडले यातच बिबट्याचा मृत्यू झाला.

Advertisement

या घटनेनंतर राजगोपाल म्हणाले की, जर मी बिबट्याला मारले नसते तर त्यानी माझ्या कुटूंबाला ठार मारले असते. यामुळे, त्याला मारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांची गर्दी जमली. बिबट्याच्या हल्ल्यात राजगोपालचे कुटुंब गंभीर जखमी झाल्याचे लोकांनी पाहिले. यानंतर लोकांनी तातडीने तिघांना रुग्णालयात पाठवले.

Advertisement
Advertisement