Take a fresh look at your lifestyle.

लाजीरवाणा प्रकार : 62 वर्षीय पाकिस्तानी खासदाराने 14 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

महाअपडेट टीम, 23 फेब्रुवारी 2021 :-  पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे 62 वर्षीय जमीअत उलेमा-ए-इस्लामचे नेते आणि ‘राष्ट्रीय विधानसभा सदस्य’ मौलाना सलाहुद्दीन अयूबी यांने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे. यावरूनच समजते की, पाकिस्तानमधील महिला आणि मुलींची दुर्दशा किती भयानक आहे. याप्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Advertisement

‘द डॉन’ नावाच्या पाकिस्तानी वृत्तानुसार, सलाहुद्दीन बलुचिस्तानमधील चित्रालचे खासदार आहेत. या खासदारांविरोधात महिलांच्या कल्याणासाठी काम करणार्‍या अंजुमन दावत-ओ-अझीमात नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने या लग्नाची माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement

पोलीस तपासात मुलीच्या शाळेने तिचे जन्म प्रमाणपत्र माध्यमांसमोर मांडल्यानंतर त्यात तिची जन्मतारीख 28 ऑक्टोबर 2006 अशी आढळून आली. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Advertisement

या स्वयंसेवी संस्थेने मीडियासमोर असा दावा केला की, बलुचिस्तानमधील या खासदाराने आपल्या वयापेक्षा चारपट लहान मुलीशी लग्न केले आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर लोकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये या खासदाराविरोधात टीका होत असून त्याच्या निलंबनाची मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement