Take a fresh look at your lifestyle.

रोज फक्त १० ते १२ मनुके भिजवून ते पाण्यासहीत खा, शरीरात होतील ‘हे’ ६ आरोग्यवर्धक बदल

महाअपडेट टीम, 23 फेब्रुवारी 2021:- मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. मनुक्यात मोठ्या प्रमाणात फायबर, अँटी ऑक्सिडेंट, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी असते तसेच झिंक आणि आयर्न हे देखील असते. आयुर्वेदात मनुक्याला विशेष स्थान असून पोटाच्या विकारांवर हे प्रभावी ठरतात. आयुर्वेदानुसार मनुके खाण्याची सर्वात सोपी आणि चांगली पद्धत म्हणजे रात्रभर ते पाण्यात भिजवून ठेवणे व सकाळी ते पाणी पिणे तसेच फुगलेले मनुके खावे.

Advertisement

त्याचप्रमाणे लाल आणि काळे. मनुका पचायला जड, मधुर, शीतल वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहे.

Advertisement

मनुक्यांच्या नियमित सेवनाने थोड्याच दिवसात रस, रक्त, शुक्र इ. धातूंची तसेच ओजाची वृद्धी होते. वृद्धावस्थेत मनुक्यांचा प्रयोग केवळ आरोग्यरक्षणच करतो असे नाही तर आयुष्य वाढविण्यातही सहाय्यक असतो. मनुक्यातील शर्करा अतिशीघ्र पचून अंगी लागते, ज्यामुळे त्वरित शाकी व स्फूर्ती मिळते.

Advertisement

शरीरात रक्ताची कमी ( रक्ताल्पता ) – मानुक्यात लोह व सर्वच जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. १०-१५ ग्रॅम काळे मनुके १ वाती पाण्यात भिजत ठेवावेत. यात थोडासा लिंबाचा रस टाकावा. ४-५ तासांनी मनुके चावून-चावून खावेत. यामुळे रक्ताल्पता दूर होते.

Advertisement

दारूच्या व्यसनापासून मुक्ती – दारू पिण्याची इच्छा होईल तेव्हा दरुएऐवजि १० ते १२ ग्रॅम मनुका चावून-चावून खात रहावे अथवा मनुकाचे सरबत करून प्यावे. दारू पिल्याने ज्ञानतंतू सुस्त होतात, परंतु मनुकाच्या सेवनाने ज्ञानतंतूंना लगेच पोषण मिळाल्याने मनुष्य उत्साह, शक्ती व प्रसन्नतेचा अनुभव करु लागतो. हा प्रयोग प्रयत्नपूर्वक करीत राहिल्याने थोड्याच दिवसात दारूचे व्यसन सुटते.

Advertisement

दौर्बल्य – अधिक परिश्रम, कुपोषण, वृद्धावस्था अथवा एखाद्या मोठ्या आजारानंतर शरीर जेव्हा क्षीण होते, तेव्हा त्वरित शक्ती मिळवण्यासाठी मनुका खूपच लाभदायी आहेत. १०-१२ मनुका २०० मि.ली. पाण्यात भिजत ठेवा आणि दोन तासांनी पाण्यासहीत खाऊन टाका.

Advertisement
Advertisement