पुण्यात टिकटॉक स्टारने क्षणात संपवलं जीवन, कारण ऐकून धक्का बसेल !
महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- मराठी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या समीर गायकवाड या २२ वर्षीय तरुणाने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातल्या राहत्या घरी त्याने साडीने पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, समीरने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सर्वात आधी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड पोहोचला होता.
या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर समीरला खाली उतरुन लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच झाल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून तो त्रस्त होता, असे समजते.
समीर हा टिकटॉक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. 22 वर्षीय त्याला हजारो लोक Tik Tok वर फॉलो करायचे. व्हिडीओ तयार करुन तो Tik tok वर अपलोड करायचा. त्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरायचे. त्याच्या इन्स्टावर फॉलोअर्सची संख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. घटनास्थळी सुसाइट नोट सापडलेली नाही. परंतु प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली असल्याचे त्याच्या मित्रांकडून बोलले जात आहे. पोलीस सर्व दिशेने तपास करत आहेत.