Take a fresh look at your lifestyle.

अखेर प्रतीक्षा संपली, टाटा मोटर्सची Tata Safari ६ व्हेरियंटसह लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021 :- टाटा मोटर्सची (Tata Motors) बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari ला आज (दि.२२) अखेर भारतात लाँच करण्यात आले आहे. टाटा मोटर्सने प्रजासत्ताक दिनी Tata Safari वरून पडदा हटवला होता. ४ फेब्रुवारीपासून ३० हजार रुपयांमध्ये बूकिंगला सुरूवात झाली होती. आज कंपनीकडून किंमत जाहीर करणात आली आहे.

Advertisement

90 च्या दशकात भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ही Tata Safari आता अधिक अपग्रेडेड तंत्रज्ञानासह आपल्या भेटीला आली आहे. Tata Safari ची सुरुवातीची किंमत कंपनीने १४.६९ लाख रुपये ठेवली आहे. टाटा सफारीला एकूण ६ व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. यात XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ+ व्हेरियंटचा समावेश आहे. भारतीय बाजारात या गाडीची टक्कर या सेगमेंटमधील Mahindra XUV500 आणि MG Hector Plus या दोन तगड्या कारशी होणार आहे.

Advertisement

Advertisement

कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन टाटा हॅरियर मध्ये वापरले गेले आहे. हे इंजिन 170PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 350Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ६ स्पीड एमटी किंवा ६ स्पीड एटी टॉर्क कन्वर्टर सोबत जोडले जाऊ शकते.याशिवाय इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड असतील.

Advertisement

या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.

Advertisement

टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.

Advertisement
Advertisement