पुण्यात कठोर निर्बंधांची घोषणा, काय सुरू राहणार, काय बंद होणार?
महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पुण्यातील कोरोना प्रादूर्भावाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांची माहिती दिली.
पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षा अभ्यासिका निम्म्या क्षमतेने सुरू राहतील.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी
रात्री 11 पासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. भाजीपाला, फळ वाहतुकीला हे निर्बंध नाहीत.
लग्न, संमेलन, खासगी, राजकीय कार्यक्रमासाठी 200 लोकांची परवानगी
लग्न समारंभासाठी पोलीस परवानगी लागणार
पुण्यातील कोव्हिड केअर सेंटर्स आणि जम्बो कोव्हिड केअर सेंटर गरज पाहून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
खाजगी क्लासेस देखील बंद राहतील.
मंडईमध्ये निर्बंध कमी असतील. पहाटेच्या वेळी भाज्यांची वाहतूक होते. त्यावर निर्बंध नसतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आणि संवाद स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध सामाजिक संघटनांची मदत घेतली जाईल.