Take a fresh look at your lifestyle.

पुण्यानंतर आता नागपुरातही कडक निर्बंधांची घोषणा, काय सुरू राहणार, काय बंद होणार?

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विदर्भातील आमरावती, नागपूर, यवतमाळमध्ये करोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर नागपुरात कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीनंतर सांगितले आहे. 

Advertisement

नागपुरात डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कडक नियमावली महत्त्वाचं म्हणजे 7 मार्चपर्यंत नागपुरातील आठवडी बाजार बंद राहणार आहेत. शाळा, कॉलेज,कोचिंग क्लासेस 7 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.

Advertisement

तर हॉटेल रात्री 9 नंतर बंद राहणार असून फक्त 50 टक्के लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. मंगल कार्यालय, हॉल, लॉन, रिसॉर्ट यावरही निर्बंध कठोर करत ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्नकार्य करता येणार आहे.

Advertisement

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना केअर सेंटर अधिक क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भागांमध्ये कंटेन्मेट झोन तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement