Take a fresh look at your lifestyle.

चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा देणाऱ्या महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांकडून लैंगिक अत्याचार

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- पारधी समाजातील एका महिलेला चारित्र्यवान असल्याचं सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालावा लागला होता. हा संतापजनक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडला आहे. परंतु या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या पीडित महिलेने आणि तिच्या पतीने गावातील एका व्यक्तीसह पोलीस कर्मचाऱ्यानंही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तिच्या पतीविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पीडिता चारित्र्यसंपन्न आहे की नाही ते तपासण्यासाठी परंडा तालुक्यातील एका गावात पारधी समाजातील एकाने उकळत्या तेलात तिला हात घायला लावला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Advertisement

त्यानंतर पीडित महिलेच्या पतीवर आणि त्या समाजाच्या जात पंचायतीवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी पीडित महिला आणि तिचा पती माध्यमांसमोर आला.

Advertisement

या दोघांनी गावातील एक व्यक्ती आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकाराला आता गंभीर वळण लागलं आहे.

Advertisement
Advertisement