Take a fresh look at your lifestyle.

सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या…पेट्रोल- डिझेलच्या करातून कमावलेले २१ लाख कोटी जनतेला…’

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021 :- काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. या दरवाढीचाच धागा पकडत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून केंद्रातल्या केंद्र सरकारला लक्ष केले आहे.

Advertisement

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पत्र पोस्ट करत त्यात लिहिले आहे की, गेल्या साडे सहा वर्षांत सरकारने डिझलवरचं उत्पादन शुल्क ८२० टक्क्यांनी तर पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क २५८ टक्क्यांना वाढवलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवर जास्त उत्पादन शुल्क आकारून सरकारने गेल्या साडेसहा वर्षात 21 लाख कोटी रुपये कमावले आहे. हा पैसा ज्यांच्यासाठी गोळा केलायं त्या लोकांपर्यंत पोहचवला पाहिजे.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वाढल्या आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी वाढ झालेली नाही. यूपीए सरकारच्या काळात तेलाच्या ज्या किंमती होत्या त्यातुलनेत आज किंमती निम्म्या आहेत.

Advertisement

Advertisement

देशात मोठ्या प्रमाणावर लोकांचे रोजगार गेले आणि उत्पन्न कमी झालं. देशातला मध्यमवर्ग चिंताग्रस्त आहे. ईंधन आणि गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे. त्यामुळे सरकारने हे वाढते दर मागे घ्यावेत आणि सामान्य, नोकरदार, शेतकरी, गरिबांना याचा फायदा पोहोचवावा, अशी मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement