Take a fresh look at your lifestyle.

काल अजित दादांच्या बैठकीत उपस्थित असलेले आमदार आज कोरोना पॉझिटिव्ह !

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व नेते एका पाठोपाठ एक असे कोरोनाच्या विळख्यात सापडले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तुपे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.  विशेष म्हणजे, काल रविवारी आमदार चेतन तुपे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला हजर होते.

Advertisement

‘नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत चांगली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असून काळजी नसावी. मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.

Advertisement

शक्य होईल तितके कामकाज व्हर्चुअल करण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करावा,’ असं आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केलं आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकामागोमाग एक कोरोना बाधित होत असल्यानं खळबळ उडाली आहे. याआधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीचे पुढील राजकीय दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Advertisement