Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : तब्बल ७ वेळा निवडून आलेल्या खासदाराची मुंबईत आत्महत्या

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोहन डेलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Advertisement

मोहन डेलकर हे 58 वर्षांचे होते, ते दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार होते. 1989 मध्ये मोहन डेलकर या मतदारसंघातून प्रथमच निवडून आले. त्यांनतर ते ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते.

Advertisement

Advertisement

मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले. २०२०मध्ये त्यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता.

Advertisement

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरवात ही कामगार संघटनेचा नेता म्हणून सुरु झाली होती. आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला आहे.

Advertisement
Advertisement