झाडाच्या सावलीत बाळाला झोपवले असता बिबट्याने हेरले, आणि मग…
महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021 :- सांगली जिल्ह्यातील तडवळे (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात 11 वर्षांच्या अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून सुफीयान शमशुद्दीन शेख असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. वनविभागामार्फत या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर माहिती अशी की, तडवळे येथे जाईच्या विहिरीजवळ बंडा शामराव पाटील यांच्या शेतात ऊस तोड चालू होती. ऊस तोडण्यासाठी बीड जिल्ह्यातील ऊस तोड मजूर आले होते. एका मजूर दाम्पत्याने बाजूला असणाऱ्या झाडाच्या सावलीत अकरा महिन्याच्या बालकाला झोपवले होते.
दुपारी बाराच्या दरम्यान शेजारी ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने संधी साधून सुफीयान याच्या नरड्याला पकडून उसात धूम ठोकत असताना सुफीयानच्या वडिलांनी पहिली व त्यांनी आरडाओरडा केला.
हा प्रकार मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. यानंतर बिबट्याने बाळाला टाकून पलायन केले. ताबडतोब त्या जखमी बाळास उचरासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.