महाअपडेट टीम, 16 फेब्रुवारी 2021 :- मध्यप्रदेश राज्यातील सीधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास 54 प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावरून घसरून थेट बाणसागर सरोवरात कोसळली.या भीषण अपघातात आत्तापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून काही वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 7 जणांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. बसमधध्ये 54 प्रवाशी होते. नेकीन परिसरात आली असताना बस रस्ता सोडून थेट सरोवरमध्ये पडली.
कालवा इतका खोल आहे की संपूर्ण बस कालव्याच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिस आहे. तसेच पाण्याचा वेगही जास्त असल्याने बचाव पथक पाणी कमी होण्याची वाट पाहत होते.सध्या क्रेनच्या मदतीनं ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्याचा वेग जास्त असल्याने यात पडलेले लोक दूर वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बसची क्षमता केवळ 32 प्रवाशांची असूनही बसमध्ये 54 प्रवाशी ठासून भरले होते. ही बस सीधी मार्गावरून सतनाकडे जात असती परंतु ट्रॅफिक असल्याने चालकाने नेहमीचा रूट बदलला. बस सरोवराला खेटून काढणे अतिशय धोकादायक होते. येथे रस्ता अतिशय अरुंद आहे. याच दरम्यान बसवरून चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट सरोवरात घसरली.