Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता संदीप नाहरची हत्या की आत्महत्या ? गोरेगाव पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

महाअपडेट टीम, 16 फेब्रुवारी 2021 :- ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहरनं १५ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा गळफास घेत आत्महत्या केली.परंतु या आत्महत्या प्रकरणात गोरेगाव पोलिसांनी नवीन खुलासा केला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नाहरचे पार्थिव घेऊन त्याची पत्नी कांचन शर्मा दोन हॉस्पिलटमध्ये गेली होती. हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी संदीपला मृत घोषित केल्यानंतर कांचन पोलिसांना माहिती न देता त्याचे पार्थिव घेऊन घरी परतली.

Advertisement

त्यांनतर पोलिसांनी संदीपच्या मृतदेहाची पाहणी करून तो ताब्यात घेतला. पोलिसांनी संदीपचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्याच्या गळ्यावर संशयास्पद व्रण दिसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज दुपारनंतर येऊ शकतो.

Advertisement

संदीपने आत्महत्येपूर्वी फेसबुकद्वारे भावनिक व्हिडिओ देखील शेयर केला होता त्यात तो पत्नी कंचन शर्मामुळे मानसिक तणावात असल्याकारणानं आपण आत्महत्या करत आहोत असं दर्शवलं होतं.मात्र संदीपने खरचं आत्महत्या केली की ती हत्या आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement