Take a fresh look at your lifestyle.

700 प्रवाशांनी भरलेलं जहाज पलटलं, 60 जणांचा बुडून मृत्यू, 300 जणांना वाचवण्यात यश

महाअपडेट टीम, 16 फेब्रुवारी 2021 :- अफ्रीकातील माई-नोमडबे प्रांतातील कांगो नदीत एका जहाज कोसळल्याने 60 जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे जहाज सुमारे 700 प्रवाशांनी भरलेलं असल्याची माहिती समोर येत आहे. जहाजातून प्रवास करणाऱ्या 700 प्रवाशांपैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. लोकांना वाचविण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

हे जहाज रविवारी रात्री किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झालं होतं. माई-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोती गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर ही भयंकर दुर्घटना घडली आहे

Advertisement

मंत्री स्टीव मबिकायी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. याशिवाय जहाजामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचं साहित्य देखील भरलं गेलं होतं. मबिकायी यांनी या घटनेत जीव गमावलेल्यांना आदरांजली व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement