Take a fresh look at your lifestyle.

WOMEN HEALTH – ‘ह्या’ 5 गोष्टींची काळजी घेतली नाही तर अनवॉन्टेड प्रेग्नंन्सी होऊ शकते !

महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :- प्रेग्नेंसीपासून वाचण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. हाच जगभरात गर्भधारणेपासून वाचण्यासाठी ही सर्वात लोकप्रिय प्रयोग आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा उपाय ९९.७ टक्के फायद्याचा आहे. पण जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर अनवॉन्टेड प्रेग्नंन्सी होऊ शकते. अभ्यासकांचं म्हणनं आहे की, प्रेग्नंसीपासून वाचण्यासाठी हा उपाय करणं सोडून दिला पाहिजे.

Advertisement

गायनॉकॉलॉजिस्ट आणि प्रसुति विशेषज्ञ डॉ.नंदिता पालशेतकर आणि डॉ.वाय.एस.नंदनवार यांच्यानुसार महिलांना त्यांनी केलेल्या या पाच चुकांमुळे अनवॉन्टेड प्रेग्नंसीचा सामना करावा लागू शकतो.

Advertisement

* औषध घेण्यात अनियमितता:
दोन गोळ्या घेण्यादरम्यान २४ तासांपेक्षा जास्त अंतर असून नये. रोज एकाच ठरलेल्या वेळेवर गोळ्या घेणे अधिक फायदेशीर आहे. जर तुम्ही सकाळी गोळ्या घेत असाल तर रोज सकाळीच गोळ्या घेतल्या गेल्या पाहिजे, तरच गोळ्यांचा योग्य तो परिणाम होतो.

Advertisement

* औषध घेण्यास दोनपेक्षा जास्त वेळ विसरलात:
डॉ.नंडनवार यांच्यानुसार, ३५ वर्षांच्या माझ्या प्रॅक्टीसमध्ये अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव औषध घेण्यात अनियमितता आली तर प्रेग्नंसीचा धोका आहे. एकदाही जर तुम्ही गोळ्या घेण्यास एकदाही विसरल्यात तर त्याचा वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागतो.

Advertisement

* उल्टी किंवा लूज मोशन:
जर तुम्हाला लूज मोशन किंवा उलट्या होत आहेत आणि गोळी घेतल्यानंतर काही तासांच्या आतच उलटी होत आहे, तर तुम्ही प्रेग्नंट राहण्याची शक्यता अधिक वाढते. कारण अशा अवस्थेत तुमच्या शरीरावर औषध हवं तसं काम करत नाही.

Advertisement

* गोळी घेतल्यानंतर लगेच असुरक्षित सेक्स
जनरली कॉन्ट्रासेप्टिव औषधे पिरीएड्सच्या दुस-या किंवा पाचव्या दिवशी सुरू होतात. जर तुम्ही तुमच्या पिरीएड्स दरम्यान अशाप्रकारच्या औषधांचा वापर करत असाल तर कमीत कमी सात दिवस तुम्ही असुरक्षित सेक्स करायला नको.

Advertisement

* जास्त तापमानात औषध ठेवणे:
या औषधांना खासकरून जास्त तापमानापासून वाचवले पाहिजे. खिडकीजवळ किंवा कारमध्ये अशी औषधे ठेवू नयेत. सोबतच सहा महिन्यांपेक्षा जास्त अशी औषधे स्टोर करून ठेवू नये.

Advertisement
Advertisement