Take a fresh look at your lifestyle.

Samsung Galaxy F62 स्मार्टफोन भारतात लाँच, 7000mAh ची दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :- सॅमसंग कंपनीने आज आपला Samsung Galaxy F62 स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. या फोनला सॅमसंग ने #FullOnSpeedy या हॅशटॅगसोबत लाँच केले आहे.

Advertisement

कंपनीने या फोनला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत २५ हजार ९९९ रुपये असणार आहे.

Advertisement

विशेष म्हणजे सॅमसंग कंपनीने या फोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे. या मोबईलमध्ये सॅमसंग एक्सीनॉस ९८२५ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर अमोलेड प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे.

Advertisement

फोनला फ्लिपकार्ट वरून फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत खरेदी करू शकाल. या फोनला लेजर ग्रीन, लेजर ब्लू आणि लेजर ग्रे या कलरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच हा फोन ICICI बँक डेबिट व क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास २ हजार ५०० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे.

Advertisement

Samsung Galaxy F62 फोनचे फीचर्स –

Advertisement

वजन – २१८ ग्रॅम
रियर कॅमेरा – ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर
फ्रंट कॅमेरा – ३२ मेगापिक्सल
बॅटरी- 7000mAh, २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टेड
फिंगरप्रिट सेन्सर

Advertisement
Advertisement