Take a fresh look at your lifestyle.

डोळ्यांची दृष्टी कशी वाढवाल, व डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय उपाय कराल ?

महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :- आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. चुकीचा आहार आणि अती कमाचा ताण यामुळे बरेच जण त्यांच्या डोळ्यांची निगा योग्यप्रकारे ठेवत नाही.

Advertisement

तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

Advertisement

डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची कारणे…
धूळ आणि धुर :
आपल्या आजुबाजुचे वातावरण खुप जास्त प्रदूषित झाले आहे. कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात. या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि धुर यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो.

Advertisement

उशीरा झोपणे :
रात्री उशीरापर्यंत लाइटमध्ये वाचणे, मोबाइलवर गेम खेळणे, टिव्ही बघणे अथवा कॉम्प्यूटरवर जास्त वेळ काम करणे यामुळे देखील डोळे कमजोर होतात.

Advertisement

कडक उन्हात बाहेर पडणे :
गॉगल न लावता कडक़ उन्हात बाहेर पडल्याने डोळ्यांना नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

Advertisement

वेग-वेगळे प्रोडक्ट लावणे :
डोळ्यांना सजवण्यासाठी बरेच जण वेग-वेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करत असतात. या प्रोडक्टमधील केमिकल्समुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होवू शकते.

Advertisement

चुकीचा आहार :
पौष्टिक आहार हा रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. याचे आहारातील प्रमाण कमी झाल्यास डोळ्यांची दृष्टी अधूक होण्याची शक्यता असते.

Advertisement

डोळ्यांची निगा कशी राखावी याबद्दल –
पाण्याने धुवा डोळे…
पाण्यामुळे बरेच फायदे होतात. तुम्ही जर अधिक बाहेर फिरत असाल तर वेळो-वेळी पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळेल. यामुळे डोळ्यांचे डिहायड्रेशन होणार नाही. तसेच डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. सारखे डोळे धुण्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते.

Advertisement

डोळ्यांना आराम मिळेल असा व्यायाम करा…
दोन्ही हात एकमेकांवर चोळून ते गरम झाल्यावर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

Advertisement

पूर्ण झोप घ्या…
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पर्याप्त झोप आवश्यक असते. कमी झोप घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तूळे तयार होतात. तसेच डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. पुर्ण झोप घेतल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते तसेच डोक़े दुखत नाही.

Advertisement

ब्रेक घ्या – तुम्ही डोळ्यांवर ताण पडणारे काम करत असल्यास थोडासा ब्रेक घ्या. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि आरोग्य उत्तम राहिल.

Advertisement

नियमित डोळ्यांची तपासणी करा…
तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास जरी होत नसला तरी वर्षातुन एकदा डोळ्याची तपासणी करुन घ्या. या तपसणीमुळे तुमच्या डोळ्यांची योग्य प्रकारे निगा राखली जाईल आणि काही निदान झाल्यास त्यावर उपचार करता येतील.

Advertisement

दुरच्या वस्तू पाहा…
आपण साधारण जवळच्या वस्तु सहज बघतो. परंतु लांबच्या वस्तु बघण्याची सवय डोळ्यांना झाली पाहिजे. डोळ्यांची दूर दृष्टी चांगली राहावी यासाठी अधून-मधून लांबच्या वस्तु बघण्याची सवय करा.

Advertisement

डोळ्यांचा मेकअप काढा…
झोपण्याआधी डोळ्यांना केलेला मेकअप काढा. रात्री झोपताना डोळ्यांना मेकअप ठेवणे धोक्याचे असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची दाट शक्यता असते. मेकमुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते.

Advertisement

सनग्‍लास वापरा – बाहेर जाण्याआधी डोळ्यांवर सनग्‍लास जरूर लावा. याने डोळ्यांवर पडणा-या पराबैंगनी किरणांपासून बचाव होईल. शक्यतो सनग्लास चांगल्या क्वालिटीचे वापरावे.

Advertisement

माशांचा आहारात सामावेश करा…
आठवड्यातून कमीत-कमी 3 वेळेस आहारामध्ये माशांचा सामावेश करा. यामुळे ड्राय-आय सिंड्रोमची समस्‍या दूर होते. माश्यांमध्ये ओमेगा-3 असल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. तसेच मोतीबिंदू होण्याची भिती कमी होते. ओमेगा 3 मुळे बुद्धी वाढण्यास मदत होते.

Advertisement

हिरव्या भाज्या- हिरव्या भाज्या ब्रोकली, पालक, साग, मेथी यांचे सेवन आहारात करावे. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी तसेच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. व्हिटॅमिन ए मुळे नाइट ब्लाइंडनेस दूर होण्यास मदत होते.

Advertisement

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पालकाचे सेवन करावे. याशिवाय व्हिटॅमिन सी असणारी फळे जसे आवळा, संत्री यांचा समावेश करावा.

Advertisement
Advertisement