Take a fresh look at your lifestyle.

संतापजनक ! पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा बलात्कार

महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :- पाच वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुण्यातील विमाननगर परिसरात घडली आहे. करण दिलीपकुमार गोस्वामी (वय २०, रा. विमाननगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.

Advertisement

समजलेली अधिक माहिती अशी की, पश्चिम बंगालमधील एक दाम्पत्य विमाननगर भागातील एका लेबर कॅम्प परिसरात वास्तव्यास आहे. मुलीचे वडील बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे आणि आई धुणीभांडी करण्याचे काम करते.

Advertisement

शनिवारी सकाळी आईवडील कामाला गेले असता मुलगी घरी एकटीच होती. या वेळी विमाननगरमधील हॉटेल सूर्या सागरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिला बाहेर बोलावले.

Advertisement

त्यानंतर त्याने मुलीला विमानतळ रस्त्यावरील एका कार शोरूमच्या पार्किंग नेले आणि तेथे बलात्कार केला. आई कामावरून दुपारी घरी आल्यानंतर मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती. मुलीला विश्वासात घेऊन माहिती जाणून घेतली असता बलात्काराचा प्रकार समोर आला. पीडित मुलीववर ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत.

Advertisement
Advertisement