गॅस आणि एसीडीटी पासून सुटका मिळवायची असेल तर ‘ह्या’ गोष्टी आजच सोडा
महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :- माणसाच्या आनंदाचा मार्ग पोटतून जातो, असे म्हटले जाते. मात्र, याच आनंदावर विरझन घालण्याचे काम पोटातील गॅस करतो. अनेकांना गॅसच्या समस्येने ग्रासलेले असते. वरवर पाहता गॅस ही किरकोळ वाटणारी गोष्ट आहे.
मात्र, ती दिसते तितकी सर्वसामान्य नाही. सर्वसामान्य वाटणारा हा गॅसच अनेक आजारांचे कारण ठरू शकतो. म्हणूनच गॅसपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आम्ही आपणास सांगत आहोत.
कार्बोनेटेड ड्रिक आणि वाईन अशा पेयांचे सेवन टाळा. कारण अशा प्रकारची पेये पदार्थ पोटात कार्बन डायऑक्साईड निर्माण करते.
एखादे पेय जर ‘स्ट्रॉ’ने प्यायची तुम्हाला सवय असेल तर, ती बंद करा. अगदी साधेपनाने ग्लासचाच वापर करा.
अधिक भरपेट आणि मसालेदार जेवण टाळा.
तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अती तणाव हेही पोटात गॅस बनन्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे तणावाला थोडासा दूरच ठेवा.
जास्त वेळ उपाशी राहू नका. जास्त वेळ उपाशी राहिल्यानेही पोटात गॅस होतो. लक्षात ठेवा तुम्ही भोजनास जितका वेळ लावाल आणि तुमचे पोट रिकामे ठेवाल तितका वेळ तुमच्या पोटात गॅस निर्माण होईल.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका. थोडा वेळ चालत रहा. त्यामुळे पचणशक्तीला चालना मिलते. तसेच, असे केल्याने पोटही फुगत नाहीत.