Take a fresh look at your lifestyle.

हिवाळ्यात काय खावे, आणि काय टाळावे, जाणून घ्या, अतिरिक्त फॅट न वाढता तंदुरुस्त राहाल !

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :- हिवाळ्यामध्ये अनेक जण व्यायाम कमी करतात. पण डाएटमध्ये तेच पदार्थ खात असतात जे व्यायाम करत असताना खात असतात. यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त फॅट जमा होण्याची भीती असते.

Advertisement

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर गरम राहण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता असते. यामुळे या दिवसामध्ये जास्ती भूक लागते.

Advertisement

वातावरणात बदल झाल्यानंतर सॅड (सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर) यापासून रक्षण करण्यासाठी अनेक जण ओव्हरडाएटिंग करत असतात.

Advertisement

हिवाळ्यात काय खावे?
जमिनीत उगवणार्‍या भाज्या गाजर, शलगम (कंदमुळे) हे पौष्टिक असतात. याचे सेवन करण्यामुळे थंडी सहन करण्याची क्षमता वाढते. यामुळे सर्दी-खोकला आणि ताप हे आजार होण्यापासून रक्षण होते.

Advertisement

ग्रीन टी
एंटी-ऑक्सिडेंट्सने भरपूर ग्रीन टी प्यायल्याने बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून रक्षण करते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

Advertisement

लसूण
लसूण खाल्ल्याने शरीर गरम राहण्यास मदत होते. लसणामुळे अनेक आजारांपासून रक्षण होते.

Advertisement

मध
मधाच्या सेवनामुळे देखील शरीरात गरमी राहण्यास मदत होते. सकाळी दुधामध्ये साखर टाकण्याऐवजी मध टाकून प्यायल्यास फायदा होईल.

Advertisement

हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी उपलब्ध असतात. ही जीवनसत्वं हिवाळ्यात शरीराला महत्त्वाची असतात.

Advertisement

फळं
संत्रे, द्राक्षे या फळांमध्ये व्हिटॅमिन सी उपलब्ध असते. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे मेटाबॉलिजम उत्तम होते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

Advertisement

काय खाणे टाळावे?

Advertisement

कार्बोहायड्रेट्स
हिवाळ्यात सर्वाधिक कार्बोहायड्रेट असलेला आहार जसे तांदूळ, ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु या पदार्थांच्या अति सेवनामुळे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे या पदार्थांच्या ऐवजी तुम्ही प्रोटीनयुक्त डाएट घेण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

गोड
हिवाळ्यात गोड पदार्थ खाणे योग्य असते असे मानण्यात येते. पण याच्या अतिसेवनामुळे वजन वाढण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे या दिवसांमध्ये केक, कुकीज यासारखे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

Advertisement

कोल्ड ड्रिंक्स
सोडा असणारे पदार्थ हिवाळ्यात प्यायल्याने वजन लवकर वाढण्याचा धोका असतो. कुकीजप्रमाणे यामध्ये देखील अधिक प्रमाणात कॅलरी असतात.

Advertisement

डेअरी प्रोडक्ट्स
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दूध आणि दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ जसे चीज, पनीर आणि तुप याच्या सेवनामुळे घसा, नाक आणि छातीमध्ये कफ होण्याची भीती असते.

Advertisement

हाय कॅलरी फूड
जाडी वाढवणारे सर्व पदार्थ खाणे टाळावे. शरीर गरम ठेवण्यासाठी तुम्हाला असे पदार्थ खाण्याची इच्छा होणे सहाजिक आहे. पण असे पदार्थ सतत खाण्यामुळे ओव्हरडायटिंग आणि जाडी वाढण्याचा धोका अधिक असतो.

Advertisement
Advertisement